केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना (वर्ष 2023-24)
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती
भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षामध्ये UPSC परीक्षेच्या
पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्याथ्र्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात येत आहे.
· प्रशिक्षणासाठी
एकूण मंजूर विद्यार्थी संख्या 1000
· प्रशिक्षणाचा
कालावधी 11 महिने
· विद्यावेतन
10,000/- ( 75% उपस्थिती
असल्यास)
· आकस्मिक
निधी 12,000/-
· प्रशिक्षणाचे ठिकाण पुणे (माध्यम- मराठी)
1. विद्यार्थी हा / ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
2. विद्यार्थी हा/ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
3. विद्यार्थी हा / ही नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
4. विद्यार्थी
हा / ही पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे
विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणाकरीता अर्ज करु शकतात.
5. महाज्योतीच्या
कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू
योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये. त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
6. विद्यार्थ्याची
अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
7. विद्यार्थ्याचे
किमान वय 21 वर्ष व
कमाल वय 35 वर्ष
पेक्षा जास्त असू नये. दिव्यांग व्यक्तीकरीता वय 37 वर्षापेक्षा अधिक असू नये.
![]() |
| MAHAJYOTI |
लाभार्थी निवड प्रक्रिया :
1. महाज्योती
मार्फत लाभाथ्र्यांची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करावा.
2. प्राप्त
अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल.
3. छाननीमध्ये
पात्र विद्याथ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार
चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
4. चाळणी
परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात
पात्र विद्यार्थ्यांची
यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात येईल.
प्रशिक्षणाचे स्वरूप :
1. विद्यार्थ्यांना
परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
2. प्रशिक्षण
अनिवासी स्वरुपाचे असेल.
3. प्रशिक्षण
हे ऑफलाईन स्वरुपाचे देण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1. आधार कार्ड
2. जातीचे
प्रमाणपत्र (Cast
Certificate)
3. रहिवासी
दाखला (Domicile
Certificate)
4. वैध
नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
5. पदवीचे
प्रमाणपत्र / मार्कशीट/अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी
उत्तीर्ण झाल्याचे
गुणपत्रक
जोडावे.
6. पासबूक
किंवा रद्द केलेला धनादेश
7. दिव्यांग
असल्यास दाखला (दिव्यांग असल्यास)
8. अनाथ
असल्यास दाखला
अटी व शर्ती :
1. अर्ज
करण्याचा अंतिम दि. 10/04/2023 राहील.
2. पोस्टाने
किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात
रद्द करणे, मुदतवाढ
देणे, अर्ज
नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे
राहतील.
4. प्रशिक्षणाकरीता
निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजु होतील त्या
दिनांकापासुन त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि
प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती
असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहिल.
5. कोणत्याही
माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर
उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास किंवा या पूर्वी सदर
योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या 'सारथी 'या कडून योजनेचा
लाभ घेतला - असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
6. महाज्योतीच्या
इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल.
7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.
8. विद्यार्थाचे बँक
खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
9. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या करावा :
संर्पक
क्र- 0712-2870120/21
E-mail Id :
mahajyotiupsc21@gmail.com
मित्रानो आपणास हि माहिती आवडली असल्यास माहिती शेअर करा

0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद